राधाई अर्बनमध्ये, प्रत्येक सदस्य आमच्या विस्तारित कुटुंबाचा भाग आहे. आम्ही आमच्या सदस्यांना प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टतेने सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, त्यांचा आर्थिक प्रवास सुरक्षित, सोयीस्कर आणि फायदेशीर आहे याची खात्री करतो. आम्ही पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सामूहिक वाढीच्या शक्तीवर विश्वास ठेवतो.
राधाई अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी नांदेड या ९ वर्षा पूर्वी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना पाहून आनंद होत आहे. राधाई अर्बन परिवाराने नेहमीच वैयक्तिक स्वार्थापेक्षा सभासदांना महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच ही संस्था आदर्श असे काम करून इतरांना दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून संस्था खऱ्या अर्थाने मजबुत झालेली आहे. व आता ती राधाई अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी मधे रूपांतर झाली आहे.
40,00,000/-
2,50,00,000/-
12,00,00,000/-
9,00,00,000/-
13,00,00,000/-
21,00,00,000/-
आपल्या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोबाईल बँकिंग ची उत्तम सुविधा दिलेली आहे. त्यामुळे खाते शिल्लक, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, लाईट बिल, गॅस, विमा, इ. सुविधा दिलेल्या आहेत मोबाईल बँकिंगमुळे २४/७ आपणास व्यवहार करता येतात.
आपल्या संस्थेच्या कोणत्याही ग्राहकाला कोणत्याही बँकेतून थेट त्याच्या अनुप्रव मधील खात्यावर रक्कम प्राप्त करता येते. त्यामुळे चेकच्या ऐवजी ऑनलाइन रक्कम पाठविणे अतिशय सोपे झाले आहे. आपल्या संस्थेचा आयएफएससी कोड पण आहे.
आपल्या संस्थेच्या ग्राहकाने कोणताही जमा / नावे व्यवहार केल्यास त्याचा एसएमएस तात्काळ त्याच्या मोबाईलवर जातो त्यामुळे बाकी अचूक समजते व पारदर्शकता निर्माण होते.
राधाई अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी आपल्या सदस्यांना आधुनिक व सोयीस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी कोअर बँकिंग प्रणाली (CBS) वापरते. यामुळे शाखा कुठलीही असो, सदस्यांना सर्व व्यवहार सहज, जलद व सुरक्षितरीत्या करता येतात.
राधाई अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये, आम्हाला तुमच्या वेळेचे आणि पैशाचे मूल्य समजते. म्हणूनच आम्ही देशभरात सहज, जलद आणि विश्वासार्ह निधी हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी RTGS, IMPS आणि NEFT सुविधा प्रदान करतो.
राधाई अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी आपल्या सदस्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध बचत व ठेवींच्या योजना उपलब्ध करून देते. आमच्या योजनांमुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि त्यावर आकर्षक व्याजदर मिळतो.