दाम दुप्पट व फिक्स डिपॉझिट खातेदारासाठी विना अट विना विलंब ठेवीच्या ८० टक्के कर्जाची उपलब्धता करण्यात येणार असून त्या सभासदाची खाते हे नियमित असावे.
दैनिक कर्ज परत फेड योजना हि शहरातील व्यवसायीक, दुकानदार दैनिक आर्थिक व्यवहाराशी संबधीत दैनिक धारकासाठी आहे यासाठी पात्रता खालील प्रमाणे
१. सहा महिने (१८० दिवस) पिग्मी खाते सुरळीत असणे आवश्यक आहे.
२. व्यवसाय हा स्थिर / बैठा असावा.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील स्वयंसाहय्य बचत गट, संयुक्त देयता समुह व विविध संघा करिता
अत्यावश्यक गरज / व्यवसायाची उभारणी व्हावी व त्यातून आर्थिक उन्नती होण्याकरिता हि
योजना अमंलात आणली आहे. त्यासाठी लागणारी पात्रता
१. बचत गट, संयुक्त देयता समुह, संघ हा संस्थेचा सभासद व खातेदार असणे आवश्यक आहे.
२. बचत गटाच्या खात्यावर कमीत कमी ६ महिने सुरळीत व्यवहार असावा.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासदाकरिता अडचणीच्या
वेळी अत्यावश्यक गरजेसाठी सोने तारण योजनेची
उपलब्धता करण्यात आली.
त्यासाठी लागणारी पात्रता
१. कर्जदार हा सभासद व खातेदार असणे आवश्यक आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातातील शासकिय व निमशासकीय कर्मचाऱ्यांकरिता त्यांच्या अडचणीच्या
वेळी पगाराच्या आधारावर त्वरीत पगार तारणावर कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
त्यासाठी...
१. त्यापदावरील पदाधिकाऱ्याचे आदेश पत्र व पगार पत्रक आवश्यक आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातातील खातेदारांसाठी वेळेची बचत आरामदायी व कमी वेळात जास्तीत
जास्त काम व्हावे याकरिता हि योजना लागू करणयात आली आहे. हि योजना पगारदार, व्यवसायीक, दैनदिन ठेव खातेदार व पिग्मी एजंटसाठी उपलब्ध करणयात आली आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासद व खातेदार असणाऱ्या ग्रामीण व अर्ध शहरी भागातील लोकाकरिता घर दुरुस्ती, दुकान बांधकाम, प्लॉट खरेदी, स्वच्छालय बांधकाम करण्याकरिता ह्या योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे यासाठी ती व्यक्ती बँकेचा खातेदार असणे.
संस्थेच्या वैयक्तिक सभासद व खातेदार असणाऱ्या व्यक्तीकरिता आर्थिक प्रगती होण्याकरिता हि योजना लागु करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी पात्रता
१. कर्जदार हा सभासद व खातेदार असणे आवश्यक आहे.
२. स्वताच्या खात्यावर कमीत कमी ६ महिने सुरळीत व्यवहार असावा.